Skip to main content

Ship of Theseus (शिप ऑफ़ थीसियस)

दृकश्राव्य माध्यमातून ज्या गोष्टी समोर येतात त्या दीर्घकाळ आपल्या स्मरणात राहतात, कधीकधी जन्मभर! सिनेमा असेच एक माध्यम आहे. आपण जो सिनेमा बघतो त्याचा आपल्यावर कळत - नकळत खोलवर परिणाम होत असतो.

बॉलीवूडने जेव्हा पुर्णतः व्यावसायिक धोरण अवलंबून आयटम साँग्स, मसाला चित्रपट बनवायचा जोर धरला नेमके त्याच काळात कंटेंटच्या शोधात असणाऱ्यांसाठी किरण राव आणि आनंद गांधी यांनी दिग्दर्शित केलेला Ship of Theseus रिलीज झाला. इ.स. २०१३ साली. 


चित्रपटाची सुरूवात खालील कोट्स पासून होते -
"As the planks of Theseus' ship needed repair, it was replaced part by part, up to a point where not a single part from the original ship remained in it, anymore. Is it, then, still the same ship?" 
 मराठी भाषांतर:
"थीसियसच्या जहाजातील फळ्या तुटल्यामुळे त्यांची एक-एक करून दुरुस्ती करण्यात आली आणि अखेरीस जहाजात मूळ जहाजातील एकही फळी उरली नाही. तर मग, ते जहाज अजूनही तेच (थिसियसचे जहाज) राहते का?"

"If all the discarded parts were used to build another ship, which of the two, if either, is the real Ship of Theseus?"
मराठी भाषांतर - 
" जर हे काढलेले सर्व भाग वापरून दुसरे जहाज तयार केले गेले, तर त्या दोन जहाजांपैकी, कोणते जहाज खर्‍या अर्थाने थिसियसचे जहाज आहे?"
................................................................. 

तेथून पुढे कहाणी सुरू होते एका-मागून एक अशा तिन पात्रांची:
१. आलिया कमल - आंधळी फोटोग्राफर
२. मैत्रेय - बुद्धिवादी (जैन) साधू
३. नवीन - स्टॉक मार्केट ब्रोकर 

तिन्ही पात्रातील प्रत्येकाच्या कहाणीत काही बारकावे दडलेले आहेत. तिघांचा एकमेकांशी दुरान्वयानेही परिचय नसला तरी एका विशिष्ट कारणाने संबंध मात्र नक्कीच असतो. तत्वज्ञानात रस असणाऱ्यांना इथे मैत्रेय आणि तरूण मुलगा चार्वाक या दोघांची मनोरंजक बौद्धिक चर्चा सुद्धा पाहायला मिळेल. 

सरतेशेवटी तिघांचीही योगायोगाने भेट होते एका एनजीओ ने निमंत्रित केलेल्या ठिकाणी. तिथे हे तिघे सोडून आणखिन ५ जण असतात. एकूण ८ जण. ह्या सर्वांचे एकाच व्यक्तीकडून (दात्याकडून) अवयव प्रत्यारोपन झालेले असते. आठही जणांना एनजीओ त्या दात्याची एक छोटीशी चित्रफीत दाखवते आणि चित्रपट संपतो. झटकन प्रेक्षकांना सुरुवातीची कोट आठवते, तिन्ही पात्रांच्या जिवनातील बदल, त्यातील बारकावे आठवायला लागतात आणि मनात सूरू होतात विविध आकलने! काही जण बोलून दाखवतील तर काहींना शब्दांत वर्णन करता येणार नाही परंतू आकलन मात्र प्रत्येकाचे काहीनाकाही असेलच. एकापेक्षा जास्तही असू शकतील.. 


फुटनोट - सोहम शाह या चित्रपटाचा प्रोड्युसर आहेय. त्याने तुम्बाड, क्रेझी हे चित्रपट सुद्धा प्रोड्यूस केलेत.

- अविनाश निरंजन वावरे 




Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आधुनिक शासन संस्था आणि सेक्युलरीजमचा अन्वयार्थ

"गॅलिलिओ विरुद्ध चर्च" सुनावणीचा खालील फोटो बघा: सतराव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत बायबलला अनुसरून इटालियन कॅथॉलिक चर्चची अशी धारणा होती की "सुर्य हा पृथ्वीभोवती फिरतो." गॅलिलिओने त्याची दुर्बीण वापरून निरीक्षण नोंदवले - सुर्य पृथ्वीभोवती फिरत नसुन पृथ्वीच सुर्याभोवती फिरते.  गॅलिलिओ तसा धर्माभिमानी कॅथॉलिक ख्रिश्चन. परंतु, त्याचे निरीक्षण चर्चच्या मताच्या पुर्णपणे विरूद्ध म्हणून चर्चने त्याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. कालांतराने तो आंधळा झाला. मरण पावला.  तेथून कित्येक वर्षांच्या वैज्ञानिक प्रगतीनंतर चर्चने आपले मत बदलले. गॅलिलिओ बरोबर होता हे मान्य केले. आता गॅलिलिओ चा अतृप्त आत्मा हातात लालसडक भाला घेऊन चर्चच्या धर्मगुरूंना शोधतही असेल तर त्याचा काय फायदा? पाखंडी घोषित करून जीव घेतला ना त्याचा!  जवळजवळ सर्वच संस्थात्मक धर्मांचा पारंपरिक उद्देश म्हणजे पारलौकिक कल्याण असतो. त्यासाठी त्या-त्या धर्माकडे एक ग्रंथ असतो. त्या ग्रंथाला सर्व धर्मानुयायी प्रमाण मानत असतात. ग्रंथातील देववाणीचा अर्थ लावणे, इतरांना समजावून सांगणे हे धर्मगुरूचे काम असते. थो...

भारतीयांचा स्किन टोन आणि झेंडुरावची कंडिशनिंग

नुकताच महिला आयसीसी विश्वचषक भारताने जिंकला आणि खालील फोटो समाजमाध्यमांत सगळीकडे व्हायरल झाला: समस्त भारतीय स्त्री-पुरूषांचा स्किन टोन ढोबळमानाने असाच काहीसा असतो!!  मात्र, आपली लहानपणापासून अशी जडणघडण झालेली आहे की आपल्याला (विशेषतः पुरूषांना) गोऱ्या कातडीचे विशेष आकर्षण आहे. समोर तुपकट चेहरा दिसला की झेंडुराव लगेच इंप्रेस्ड होऊन जातो. गोऱ्या कातडीला स्त्रिया सुद्धा मापदंड मानून तसं दिसण्याचा प्रयत्न करतात. आपलं अपत्य सुद्धा गोरं असावं असे सगळ्यांना मनोमन वाटतच राहते. कसलीही सृजनशीलता नसलेल्या, कौशल्य, नवनिर्मितीची इच्छा नसलेल्या, गुणवत्ताहीन, ढिम्म अशा पोरींना आपल्यातले झेंडुराव फक्त तिची कातडी गोरी आहे म्हणून अख्खं  आयुष्य फुकट प्रिवीलेज देतात. "तोंड पहा आणि फुले वाहा" म्हणत जी गोष्ट आईवडिलांकडून फुकटात मिळाली त्याला Asset समजून अगदी शुन्य कर्तुत्व असलेली पोरगीही स्वतःला ग्रेट समजू लागते. तिच्यासारख्या समकक्ष दिसायला असण्याऱ्याच मुलींशीच मैत्री करते. तर, झेंडुराव तुझी कंडिशनिंग चुकीची झालीये. हे तुपकट सौंदर्य म्हणजे मुळ भारतीय सौंदर्य नव्हे. गोरा रंग म्हणजे काह...

शाश्वत पुनरावृत्ती

मीच इतका का अस्ताव्यस्त? हा प्रश्न मनात पुन्हा-पुन्हा गुंततो. काहीतरी चुकतंय का माझ्यात, हा विचार डोक्यात वादळासारखा घोळतो. पण मित्रा — तू एकटा नाहीस या मार्गावर. अर्थ शोधणारे असंख्य जीव तुझ्या सोबतीला चालत आहेत निरंतर. अडचणी वेगळ्या, पण चक्र एकच, शाश्वत पुनरावृत्ती सुरूच अखंडित. हेच कटू वास्तव मान्य कर,   शिकव मनाला स्वीकाराचे सूरसंगीत!  जेव्हा उमजेल जाणीव-नेणीवेतून — सुटका नाही या प्रवासातून, तेव्हाच उघडतील अंतःकरणाचे दरवाजे, आणि त्यातून झुळूक येईल — मोक्षाची!!  - अविनाश निरंजन वावरे