मीच इतका का अस्ताव्यस्त?
हा प्रश्न मनात पुन्हा-पुन्हा गुंततो.
काहीतरी चुकतंय का माझ्यात,
हा विचार डोक्यात वादळासारखा घोळतो.
पण मित्रा —
तू एकटा नाहीस या मार्गावर.
अर्थ शोधणारे असंख्य जीव
तुझ्या सोबतीला चालत आहेत निरंतर.
अडचणी वेगळ्या, पण चक्र एकच,
शाश्वत पुनरावृत्ती सुरूच अखंडित.
हेच कटू वास्तव मान्य कर,
शिकव मनाला स्वीकाराचे सूरसंगीत!
जेव्हा उमजेल जाणीव-नेणीवेतून —
सुटका नाही या प्रवासातून,
तेव्हाच उघडतील अंतःकरणाचे दरवाजे,
आणि त्यातून झुळूक येईल — मोक्षाची!!
- अविनाश निरंजन वावरे
Comments
Post a Comment