एक काळ असाही होता की लोकं मालकाकडे सालाने काम करायचे. जमिनदार, व्यापारी, उद्योजक ह्यांच्याकडे काम करणाऱ्या अशा लोकांना सालगडी म्हणत. सालगड्याला वर्षभर काम करून मोबदला म्हणून तुटपुंजे धान्य मिळतसे. पैसे मिळत नव्हते. जेवढे धान्य मिळी त्यातून कुटूंबाचे पोट नाही भरले तर घरातील अल्पवयीन मुलांसह इतरही मंडळी रोजंदारीचे काम शोधायचे. पिढ्यानपिढ्या राबून हाती काहीही उरत नसे. कुटुंबाची प्रगती दुरची गोष्ट. हे दुष्टचक्र असच एका पिढीकडून दुसर्या पिढीपर्यंत अव्याहत चालू राहायचे. ह्यातून सुटकाही नव्हती. आता सालगडी दिसतात का? तर - नाही. मजुर कामासाठी मिळणाऱ्या वेतनात सौदा करू शकतो. त्याला परवडले तर तो काम स्विकारतो अन्यथा नाकारतो. कित्येक जण कामाला मजूरच मिळत नाही अशी चर्चा आजूबाजूला करताना दिसतातच. सोशल सेक्युरीटी, डिबीटी इ. मुळे मजूर भाव खातात अशी खंतही अधुनमधुन व्यक्त होताना दिसते. केवळ ५०० मीटर पायी चालला तरी दमछाक होणारा म्हणतो की ८-८ तास शारिरीक परिश्रम करणारे "मजूर आळशी झालेत!" तर मित्रा, तू ठरवलेल्या भावात मजूर मिळत नाही म्हणून जी खंत व्यक्त करतो त्याच भावात तू स्वतः ८ तास इतर कुणा...