दृकश्राव्य माध्यमातून ज्या गोष्टी समोर येतात त्या दीर्घकाळ आपल्या स्मरणात राहतात, कधीकधी जन्मभर! सिनेमा असेच एक माध्यम आहे. आपण जो सिनेमा बघतो त्याचा आपल्यावर कळत - नकळत खोलवर परिणाम होत असतो.
बॉलीवूडने जेव्हा पुर्णतः व्यावसायिक धोरण अवलंबून आयटम साँग्स, मसाला चित्रपट बनवायचा जोर धरला नेमके त्याच काळात कंटेंटच्या शोधात असणाऱ्यांसाठी किरण राव आणि आनंद गांधी यांनी दिग्दर्शित केलेला Ship of Theseus रिलीज झाला. इ.स. २०१३ साली.
चित्रपटाची सुरूवात खालील कोट्स पासून होते -
"As the planks of Theseus' ship needed repair, it was replaced part by part, up to a point where not a single part from the original ship remained in it, anymore. Is it, then, still the same ship?"
मराठी भाषांतर:
"थीसियसच्या जहाजातील फळ्या तुटल्यामुळे त्यांची एक-एक करून दुरुस्ती करण्यात आली आणि अखेरीस जहाजात मूळ जहाजातील एकही फळी उरली नाही. तर मग, ते जहाज अजूनही तेच (थिसियसचे जहाज) राहते का?"
"If all the discarded parts were used to build another ship, which of the two, if either, is the real Ship of Theseus?"
मराठी भाषांतर -
" जर हे काढलेले सर्व भाग वापरून दुसरे जहाज तयार केले गेले, तर त्या दोन जहाजांपैकी, कोणते जहाज खर्या अर्थाने थिसियसचे जहाज आहे?"
.................................................................
तेथून पुढे कहाणी सुरू होते एका-मागून एक अशा तिन पात्रांची:
१. आलिया कमल - आंधळी फोटोग्राफर
२. मैत्रेय - बुद्धिवादी (जैन) साधू
३. नवीन - स्टॉक मार्केट ब्रोकर
तिन्ही पात्रातील प्रत्येकाच्या कहाणीत काही बारकावे दडलेले आहेत. तिघांचा एकमेकांशी दुरान्वयानेही परिचय नसला तरी एका विशिष्ट कारणाने संबंध मात्र नक्कीच असतो. तत्वज्ञानात रस असणाऱ्यांना इथे मैत्रेय आणि तरूण मुलगा चार्वाक या दोघांची मनोरंजक बौद्धिक चर्चा सुद्धा पाहायला मिळेल.
सरतेशेवटी तिघांचीही योगायोगाने भेट होते एका एनजीओ ने निमंत्रित केलेल्या ठिकाणी. तिथे हे तिघे सोडून आणखिन ५ जण असतात. एकूण ८ जण. ह्या सर्वांचे एकाच व्यक्तीकडून (दात्याकडून) अवयव प्रत्यारोपन झालेले असते. आठही जणांना एनजीओ त्या दात्याची एक छोटीशी चित्रफीत दाखवते आणि चित्रपट संपतो. झटकन प्रेक्षकांना सुरुवातीची कोट आठवते, तिन्ही पात्रांच्या जिवनातील बदल, त्यातील बारकावे आठवायला लागतात आणि मनात सूरू होतात विविध आकलने! काही जण बोलून दाखवतील तर काहींना शब्दांत वर्णन करता येणार नाही परंतू आकलन मात्र प्रत्येकाचे काहीनाकाही असेलच. एकापेक्षा जास्तही असू शकतील..
फुटनोट - सोहम शाह या चित्रपटाचा प्रोड्युसर आहेय. त्याने तुम्बाड, क्रेझी हे चित्रपट सुद्धा प्रोड्यूस केलेत.
- अविनाश निरंजन वावरे
विचार करायला लावणारा चित्रपट आहे
ReplyDeleteहो.
Delete