Skip to main content

Posts

महाभिनिष्क्रमण

ऊर्जेच्या स्त्रोतांवर, खनिजे, नैसर्गिक साधनसंपत्तीवर ज्यांचे नियंत्रण राहील ते जगावरही नियंत्रण ठेवू शकतात. तेच लोक पृथ्वीवरील फुकटात उपलब्ध असलेल्या मटेरियल गोष्टींना बळकावून आपल्या इवल्याशा क्षणभंगुर जिवनात शक्तिशाली बनू इच्छितात, भलेही कितीही जिवितहानी होवो.  काहींना जमेल त्या मार्गाने, वेळ पडल्यास मानवाला जबरदस्तीही करून एकच अल-इल्लाह चे शासन प्रस्थापित करायचे आहे. ईश्वराकडे पोहोचण्याचा एकच मार्ग अन्य कोणताही नसतो म्हणून शून्य उपद्रव करणाऱ्यांनाही तुमचा मार्ग चुकला असे बजावून आपल्यासारखे करून घेणे आणि ह्या कार्याला दैवी मानून मानवाचे स्वतंत्र बुद्धीच्या वापराचे स्वातंत्र्य हिरावून घ्यायचे आहे. कशासाठी? तर - सर्वांना स्वर्गात जाता यावे हा विचार अमलात आणण्यासाठी! यातही जिवितहानीची पर्वा केल्या जात नाही.  सध्या सुरू असलेल्या इस्रायल - अमेरिका - इराण युद्धाचे दोन महत्त्वाचे पैलू म्हणजे साम्राज्यशाही आणि अब्राहमिक धर्मवाद आहे. सुमारे अडिच हजार वर्षांपूर्वी एक घटना घडली होती. त्या घटनेचे नाव " महाभिनिष्क्रमण " म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. महाभिनिष्क्रमण ह्या शब...
Recent posts

श्रमप्रतिष्ठा (संविधान दिनाच्या निमित्ताने)

एक काळ असाही होता की लोकं मालकाकडे सालाने काम करायचे. जमिनदार, व्यापारी, उद्योजक ह्यांच्याकडे काम करणाऱ्या अशा लोकांना सालगडी म्हणत. सालगड्याला वर्षभर काम करून मोबदला म्हणून तुटपुंजे धान्य मिळतसे. पैसे मिळत नव्हते. जेवढे धान्य मिळी त्यातून कुटूंबाचे पोट नाही भरले तर घरातील अल्पवयीन मुलांसह इतरही मंडळी रोजंदारीचे काम शोधायचे.  पिढ्यानपिढ्या राबून हाती काहीही उरत नसे. कुटुंबाची प्रगती दुरची गोष्ट. हे दुष्टचक्र असच एका पिढीकडून दुसर्‍या पिढीपर्यंत अव्याहत चालू राहायचे. ह्यातून सुटकाही नव्हती. आता सालगडी दिसतात का? तर - नाही. मजुर कामासाठी मिळणाऱ्या वेतनात सौदा करू शकतो. त्याला परवडले तर तो काम स्विकारतो अन्यथा नाकारतो. कित्येक जण कामाला मजूरच मिळत नाही अशी चर्चा आजूबाजूला करताना दिसतातच. सोशल सेक्युरीटी, डिबीटी इ. मुळे मजूर भाव खातात अशी खंतही अधुनमधुन व्यक्त होताना दिसते. केवळ ५०० मीटर पायी चालला तरी दमछाक होणारा म्हणतो की ८-८ तास शारिरीक परिश्रम करणारे "मजूर आळशी झालेत!"  तर मित्रा, तू ठरवलेल्या भावात मजूर मिळत नाही म्हणून जी खंत व्यक्त करतो त्याच भावात तू स्वतः ८ तास इतर कुणा...

Ship of Theseus (शिप ऑफ़ थीसियस)

दृकश्राव्य माध्यमातून ज्या गोष्टी समोर येतात त्या दीर्घकाळ आपल्या स्मरणात राहतात, कधीकधी जन्मभर! सिनेमा असेच एक माध्यम आहे. आपण जो सिनेमा बघतो त्याचा आपल्यावर कळत - नकळत खोलवर परिणाम होत असतो. बॉलीवूडने जेव्हा पुर्णतः व्यावसायिक धोरण अवलंबून आयटम साँग्स, मसाला चित्रपट बनवायचा जोर धरला नेमके त्याच काळात कंटेंटच्या शोधात असणाऱ्यांसाठी किरण राव आणि आनंद गांधी यांनी दिग्दर्शित केलेला Ship of Theseus रिलीज झाला. इ.स. २०१३ साली.  चित्रपटाची सुरूवात खालील कोट्स पासून होते - "As the planks of Theseus' ship needed repair, it was replaced part by part, up to a point where not a single part from the original ship remained in it, anymore. Is it, then, still the same ship?"   मराठी भाषांतर: "थीसियसच्या जहाजातील फळ्या तुटल्यामुळे त्यांची एक-एक करून दुरुस्ती करण्यात आली आणि अखेरीस जहाजात मूळ जहाजातील एकही फळी उरली नाही. तर मग, ते जहाज अजूनही तेच (थिसियसचे जहाज) राहते का?" "If all the discarded parts were used to build another ship, which of the two, if either,...

आधुनिक शासन संस्था आणि सेक्युलरीजमचा अन्वयार्थ

"गॅलिलिओ विरुद्ध चर्च" सुनावणीचा खालील फोटो बघा: सतराव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत बायबलला अनुसरून इटालियन कॅथॉलिक चर्चची अशी धारणा होती की "सुर्य हा पृथ्वीभोवती फिरतो." गॅलिलिओने त्याची दुर्बीण वापरून निरीक्षण नोंदवले - सुर्य पृथ्वीभोवती फिरत नसुन पृथ्वीच सुर्याभोवती फिरते.  गॅलिलिओ तसा धर्माभिमानी कॅथॉलिक ख्रिश्चन. परंतु, त्याचे निरीक्षण चर्चच्या मताच्या पुर्णपणे विरूद्ध म्हणून चर्चने त्याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. कालांतराने तो आंधळा झाला. मरण पावला.  तेथून कित्येक वर्षांच्या वैज्ञानिक प्रगतीनंतर चर्चने आपले मत बदलले. गॅलिलिओ बरोबर होता हे मान्य केले. आता गॅलिलिओ चा अतृप्त आत्मा हातात लालसडक भाला घेऊन चर्चच्या धर्मगुरूंना शोधतही असेल तर त्याचा काय फायदा? पाखंडी घोषित करून जीव घेतला ना त्याचा!  जवळजवळ सर्वच संस्थात्मक धर्मांचा पारंपरिक उद्देश म्हणजे पारलौकिक कल्याण असतो. त्यासाठी त्या-त्या धर्माकडे एक ग्रंथ असतो. त्या ग्रंथाला सर्व धर्मानुयायी प्रमाण मानत असतात. ग्रंथातील देववाणीचा अर्थ लावणे, इतरांना समजावून सांगणे हे धर्मगुरूचे काम असते. थो...

शाश्वत पुनरावृत्ती

मीच इतका का अस्ताव्यस्त? हा प्रश्न मनात पुन्हा-पुन्हा गुंततो. काहीतरी चुकतंय का माझ्यात, हा विचार डोक्यात वादळासारखा घोळतो. पण मित्रा — तू एकटा नाहीस या मार्गावर. अर्थ शोधणारे असंख्य जीव तुझ्या सोबतीला चालत आहेत निरंतर. अडचणी वेगळ्या, पण चक्र एकच, शाश्वत पुनरावृत्ती सुरूच अखंडित. हेच कटू वास्तव मान्य कर,   शिकव मनाला स्वीकाराचे सूरसंगीत!  जेव्हा उमजेल जाणीव-नेणीवेतून — सुटका नाही या प्रवासातून, तेव्हाच उघडतील अंतःकरणाचे दरवाजे, आणि त्यातून झुळूक येईल — मोक्षाची!!  - अविनाश निरंजन वावरे 

भारतीयांचा स्किन टोन आणि झेंडुरावची कंडिशनिंग

नुकताच महिला आयसीसी विश्वचषक भारताने जिंकला आणि खालील फोटो समाजमाध्यमांत सगळीकडे व्हायरल झाला: समस्त भारतीय स्त्री-पुरूषांचा स्किन टोन ढोबळमानाने असाच काहीसा असतो!!  मात्र, आपली लहानपणापासून अशी जडणघडण झालेली आहे की आपल्याला (विशेषतः पुरूषांना) गोऱ्या कातडीचे विशेष आकर्षण आहे. समोर तुपकट चेहरा दिसला की झेंडुराव लगेच इंप्रेस्ड होऊन जातो. गोऱ्या कातडीला स्त्रिया सुद्धा मापदंड मानून तसं दिसण्याचा प्रयत्न करतात. आपलं अपत्य सुद्धा गोरं असावं असे सगळ्यांना मनोमन वाटतच राहते. कसलीही सृजनशीलता नसलेल्या, कौशल्य, नवनिर्मितीची इच्छा नसलेल्या, गुणवत्ताहीन, ढिम्म अशा पोरींना आपल्यातले झेंडुराव फक्त तिची कातडी गोरी आहे म्हणून अख्खं  आयुष्य फुकट प्रिवीलेज देतात. "तोंड पहा आणि फुले वाहा" म्हणत जी गोष्ट आईवडिलांकडून फुकटात मिळाली त्याला Asset समजून अगदी शुन्य कर्तुत्व असलेली पोरगीही स्वतःला ग्रेट समजू लागते. तिच्यासारख्या समकक्ष दिसायला असण्याऱ्याच मुलींशीच मैत्री करते. तर, झेंडुराव तुझी कंडिशनिंग चुकीची झालीये. हे तुपकट सौंदर्य म्हणजे मुळ भारतीय सौंदर्य नव्हे. गोरा रंग म्हणजे काह...