नुकताच महिला आयसीसी विश्वचषक भारताने जिंकला आणि खालील फोटो समाजमाध्यमांत सगळीकडे व्हायरल झाला:
मात्र, आपली लहानपणापासून अशी जडणघडण झालेली आहे की आपल्याला (विशेषतः पुरूषांना) गोऱ्या कातडीचे विशेष आकर्षण आहे. समोर तुपकट चेहरा दिसला की झेंडुराव लगेच इंप्रेस्ड होऊन जातो. गोऱ्या कातडीला स्त्रिया सुद्धा मापदंड मानून तसं दिसण्याचा प्रयत्न करतात. आपलं अपत्य सुद्धा गोरं असावं असे सगळ्यांना मनोमन वाटतच राहते.
कसलीही सृजनशीलता नसलेल्या, कौशल्य, नवनिर्मितीची इच्छा नसलेल्या, गुणवत्ताहीन, ढिम्म अशा पोरींना आपल्यातले झेंडुराव फक्त तिची कातडी गोरी आहे म्हणून अख्खं आयुष्य फुकट प्रिवीलेज देतात.
"तोंड पहा आणि फुले वाहा" म्हणत जी गोष्ट आईवडिलांकडून फुकटात मिळाली त्याला Asset समजून अगदी शुन्य कर्तुत्व असलेली पोरगीही स्वतःला ग्रेट समजू लागते. तिच्यासारख्या समकक्ष दिसायला असण्याऱ्याच मुलींशीच मैत्री करते.
तर, झेंडुराव तुझी कंडिशनिंग चुकीची झालीये. हे तुपकट सौंदर्य म्हणजे मुळ भारतीय सौंदर्य नव्हे. गोरा रंग म्हणजे काहितरी विशेष नसतेय. इंग्रज आर्थिक शोषण करून केव्हाच भारत सोडून गेले. तुझ्या लॉजिक नुसार तर अमेरिकेतील भिकारी, गुंड-मवाली सुद्धा अतिसुंदर म्हणायला हवे मग!
झेंडुराव, खरं सौंदर्य हे संघर्षात असतय. रंग कोणताही असुदे, तिच्यातील सृजनशीलता, कला पारख. सई पल्लवी मिनीमल मेकअप, चेहर्यावरील पिंपल्स सहित तुला सुंदर दिसेल. गुणवत्तेचा unapologetic कॉन्फिडन्स असा झळकत असतो!
चेहर्यावर फेअरनेस क्रिमच्या दोन-चार लेयर्स चिपकवल्याशिवाय घराबाहेर निघायचा जिच्यात कॉन्फिडन्स नाही ती स्त्री काय दिवा लावणारे तुझ्या आयुष्यात? कंडिशनिंग मधून बाहेर ये. थिंक फॉर लॉंग टर्म! Unlearn what is learned!!
- अविनाश निरंजन वावरे
Comments
Post a Comment